राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात मिळणार सवलत?

By Admin | Updated: December 25, 2014 23:35 IST2014-12-25T23:35:28+5:302014-12-25T23:35:28+5:30

कृषी विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळेल लाभ.

For the students of the state, the concession in education fee? | राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात मिळणार सवलत?

राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात मिळणार सवलत?

राजरत्न सिरसाट/अकोला: राज्यात उद्भवलेली दुष्काळस्थिती बघता, राज्यशासनाने दुष्काळी भागातील विविध, शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश संबधीत शिक्षण संस्था, महाविद्यालयांना पाठविले आहेत. कृषी विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आकारले जाते, त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सलवत मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास या निर्णयाचा लाभ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
विदर्भातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आजमितीस पीएचडी, पदव्यूत्तर, पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी ५,६१५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात कृषी, कृषी जैवतंज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी मिळून ५0 विद्यार्थी पीएचडी करीत आहेत. तीन वर्षाच्या या अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी प्रत्येकी ११ हजार ८६ रू पये शिक्षण शुल्क भरावे लागते, तर दुसर्‍या वर्षी ७, ३00 आणि वसतीगृहाचा खर्च मिळून या विद्यार्थ्यांना १४,६८६ रू पये खर्च येतो. कृषीच्या विविध शाखेच्या अभ्यासक्रमाला ४0५ विद्यार्थी आहेत. यातील कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रथम आणि व्दितीय वर्षासाठी प्रत्येकी ४ हजार रू पये शिक्षण शुल्क आहे. कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी जैवतंज्ञत्रान या पदव्यूत्तर शाखेच्या दोन अभ्यासक्रमासाठी या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाला ५८,५८६ तर व्दितीय वर्षाला २३,३00 रू पये शिक्षण शुल्क भरावे लागतात. कृषी अभ्यासक्रमाच्या २३ खाजगी महाविद्यालयातून विविध शाखेत शिक्षण घेणारे १,३८0 विद्यार्थी असून, कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या ५७ आणि कृषी विद्यापीठाच्या ६ मिळून ६३ कृषी तंत्रज्ञान शाळा आहेत. या शाळामध्ये ३,७८0 विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमाला आहेत. राज्यातील दुष्काळीस्थिीती बघता, यासर्व विद्यार्थ्यांंना शासनाने शिक्षण शुल्काची सवलत जाहीर केली आहे. या संबधीचे पत्र डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह नाशिक व अमरावती विभागाला प्राप्त झाल्याची माहिती आहे.
डॉ. पंदेकृविचे कृषी अधिष्ठाता डॉ. व्ही.एम.भाले यांनी शासनाचे पत्र प्राप्त झाले असल्याचे सांगून शिक्षण की परीक्षा शुल्क माफ करणार याबाबत आताच काही सांगता येणार नसल्याचे सांगीतले. कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्कच घेतले जात असल्याने शासनाला शिक्षण शुल्क सवलतीचा लाभ विद्यार्थ्यांंना द्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: For the students of the state, the concession in education fee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.