विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: January 6, 2015 01:20 IST2015-01-06T01:20:17+5:302015-01-06T01:20:17+5:30
अकोला जि.प.अध्यक्षांच्या दालनात आंदोलनाची घेतली तत्काळ दखल : बोरगाव वैराळेला तातडीने केली शिक्षकाची नियुक्ती.

विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
बोरगाव वैराळे (अकोला ): येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये मागील दोन वर्षांंपासून पटसंख्येनुसार शिक्षकांची दोन पदे रिक्त आहेत. येथे सध्या कार्यरत असलेल्या तीन शिक्षकांपैकी एक जण आजारी रजेवर असून, दुसरा प्रशिक्षणाला गेला आहे. परिणामी, मागील १0 दिवसांपासून शाळेतील १५0 विद्यार्थ्यांंना एकच शिक्षक शिकवित असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी यापूर्वीच ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्या इशार्यानुसार सोमवार, ५ जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या दालनात पोहोचून तेथे ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला.
या आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश वैराळे, विनायक वैराळे, प्रल्हाद वानखडे, माणिकराव वानखडे, पुरुषोत्तम डोंगरे, विठ्ठल पारिसे, दीपक वैराळे हे प्रामुख्याने सहभागी झाले होते. जोपर्यंंत शिक्षक देणार नाही, तोपर्यंंत ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असा आंदोलकांनी पवित्रा घेतल्यामुळे जि.प.अध्यक्ष शरद गवई यांनी शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांना बोलावून बोरगाव वैराळे येथील जि.प.शाळेवर तत्काळ शिक्षक नियुक्त करण्याचे आदेश दिले. यावेळी शिक्षणाधिकारी कचवे यांनी ह्यलोकमतह्ण मधील वृत्ताची दखल घेऊन यापूर्वीच शिक्षक नियुक्त केला असून, सदर शिक्षक बोरगाव वैराळे येथील शाळेवर दुपारी १२ वाजता रुजू झाला असल्याची माहिती दिली. त्याची ऑर्डर दाखविली. त्यामुळे आंदोलन करणार्या आंदोलक विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.