शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच मिळणार पाठ्यपुस्तके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:42 IST

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करून त्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न राहणार आहे.

अकोला: राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी २६ जून रोजी जिल्ह्यातील शाळा उघडण्यात येणार आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करून त्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार विद्यार्थ्यांसाठी ९ लाख ७२ हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याचा मानस आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद आणि शासकीय, अनुदानित, शाळांमधील पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली होती. त्यानुसार बालभारतीकडून ९ लाख २२ हजार पाठ्यपुस्तकांचा पुरवठा शालेय शिक्षण विभागाला करण्यात आला आहे. पुस्तकांचा साठा प्राप्त झाला असून, पंचायत समिती स्तरावर लवकरच पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतील. २२ जूनपर्यंत शाळांना १00 टक्के पाठ्यपुस्तके वितरित करण्याचे नियोजन समग्र शिक्षा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. (प्रतिनिधी)शालेय गणवेशाच्या निधीसाठी प्रतीक्षा!शासनाने आता शालेय गणवेश देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांना कापड खरेदीचे अधिकार दिले आहेत. शासनाकडून देण्यात आलेल्या निधीतून हे कापड खरेदी करावे लागणार आहे; परंतु अद्याप शासनाने गणवेशासाठी निधी दिलेला नाही. २६ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने, गणवेशासाठी निधी मिळाला असता तर शाळा व्यवस्थापन समित्यांनी गणवेशासाठी कापड खरेदी करून विद्यार्थ्यांचे मोजमाप करून ते कापड टेलर्सकडे शिवायला दिले असते आणि शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसोबतच गणवेशसुद्धा मिळाला असता; परंतु गणवेशाच्या निधीसाठी शिक्षण विभागाला प्रतीक्षा करावी लागत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाStudentविद्यार्थी