विद्यार्थ्यांच्या ‘आनापान वर्गा’ची शिक्षकांकडून दखलच नाही
By Admin | Updated: April 16, 2015 01:40 IST2015-04-16T01:40:13+5:302015-04-16T01:40:13+5:30
शिक्षकांची प्रशिक्षणापासून पळवाट, मित्र उपक्रम फसला.

विद्यार्थ्यांच्या ‘आनापान वर्गा’ची शिक्षकांकडून दखलच नाही
प्रवीण खेते / अकोला:
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये ह्यआनापान वर्गह्ण चालविण्यात येतात. त्या अनुषंगाने मित्र उपक्रमाच्या साहाय्याने शाळेतील शिक्षकांना दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते. परंतु, प्रशिक्षणासाठी १२ दिवस कुटुंबापासून दूर राहावे लागत असल्याने जिल्ह्यासह राज्यातील शिक्षकांनी आनापान वर्गाच्या प्रशिक्षण वर्गापासून पळवाट काढल्याचे समोर आले आहे.
समाजामध्ये जलद गतीने पसरत असलेल्या वाईट विचारसरणीला कुठेतरी अंकुश लावता यावा, यासाठी मुलांमध्ये विद्यार्थीदशेत असतानाच सदाचाराची भावना निर्माण होणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा सर्व शाळांमध्ये ह्यआनापान वर्गह्ण सुरू करण्यात आले आहे. या वर्गाद्वारे देशातील भावी पिढी निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण, मौन पाळणे, ध्यान लावणे यासोबतच वाईट विचारसरणीचा त्याग करण्याची शिकवण दिल्या जाते. विद्यार्थीदशेत मुलांमध्ये चांगले विचार शिक्षकच रुजवू शकतो. म्हणून ह्यमाइंड इन ट्रेनिंग फोर राईट अवेअरनेसह्ण म्हणजेच मित्र उपक्रमाद्वारे शिक्षकांना दरवर्षी प्रशिक्षण दिल्या जाते. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील तेल्हारा तालुकास्थित खापरखेडा फाट्यावरील ह्यधम्मा अनाकुला विपश्यना साधना केंद्रह्णची निवड करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण केंद्र अकोला, वाशिम व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आहे. या केंद्रामध्ये प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या शिक्षकांना १२ दिवस प्रशिक्षण दिल्या जाते. या प्रशिक्षण काळात शिक्षकाला समाजापासून अलिप्त राहावे लागते. त्यामुळे शैक्षणिक सत्र २0१४ -१५ मध्ये निवड झालेल्या शिक्षकांनी प्रशिक्षणापासून पळवाटा काढल्याचे दिसून आले. परिणामी सर्वांगीण विकास साधणार्या आनापान वर्गापासून विद्यार्थी वंचित राहिले आहेत.
शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वावरदेखील या प्रशिक्षणाचा चांगला परिणाम झाला असता; परंतु शासनाच्या चांगल्या उपक्रमाचा नेहमीच फज्जा उडविल्या जातो. याचेच एक उदाहरण म्हणून आपण फसलेल्या मित्र उपक्रमाचे देऊ शकतो.
*काय आहे आनापान वर्ग?
आनापान वर्गाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना श्वास घेणे व सोडण्याची प्रक्रिया करायला लावतात. दहा मिनिटांच्या या प्रक्रियेनंतर मन शांती होऊन मन एकाग्र होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक व वैचारिक प्राबल्य निर्माण होते. आपसातील मतभेद, मानसिक अस्थिरता, चंचलपणा, वाईट विचार नष्ट होतात. तसेच विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता वाढून परीक्षेची भीतीदेखील कमी होते.
*संभाव्य अनुचित प्रकार टाळता येतात
विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमध्येही वाईट विचार येऊ नयेत, सर्वांमध्ये मैत्रीची भावना निर्माण व्हावी तसेच अश्लील विचारांवर अंकुश राहावा, या अनुषंगाने सर्वच शाळांमध्ये मैत्री उपक्रमांतर्गत ह्यआनापान वर्गह्ण राबविण्याचा उद्देश होता; परंतु शैक्षणिक सत्र २0१४-१५ मध्ये जिल्ह्यासह राज्यातही हा उपक्रम राबविण्यात आला नाही. सर्व शिक्षा अभियानांतर्गत ह्यआनापान वर्गाह्णचे गांभीर्य लक्षात घेऊन हा उपक्रम राबविल्यास संभाव्य अनुचित प्रकार टाळता येतात.