एमएच-सीईटीमध्ये अकोल्यातील विद्यार्थ्यांची बाजी
By Admin | Updated: June 7, 2014 01:05 IST2014-06-07T00:59:58+5:302014-06-07T01:05:08+5:30
एमएच-सीईटी निकाल गुरुवारी जाहीर; निकालामध्ये अकोल्यातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केले घवघवीत यश.

एमएच-सीईटीमध्ये अकोल्यातील विद्यार्थ्यांची बाजी
अकोला : एमएच-सीईटी निकाल गुरुवारी उशिरा जाहीर झाला. निकालामध्ये अकोल्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. सारांक्ष वखारियाने एमएच-सीईटीमध्ये ७२0 पैकी ६४५ गुण घेऊन जिल्हय़ातून पहिला येण्याचा मान पटकाविला. समीक्षा महल्ले हिने ६३८ गुण घेत ओबीसी प्रवर्गातून राज्यातून पहिली आणि उज्ज्वला इंगळे हिने ६१२ गुण मिळवून मागासवर्गीयांमधून राज्यातून पहिली येण्याचा मान पटकावला आहे. यासोबतच शुभम उगले याने ६३६ गुण मिळवित आणि प्रतीक मसने ६३५ यांनीही घवघवीत यश प्राप्त केले.
एमएच-सीईटी परीक्षेत सारांक्ष वखारिया याने बाजी मारली आहे. एमएच-सीईटी परीक्षेसोबतच सारांक्ष याने महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज (सेवाग्राम मेडिकल कॉलेज) या परीक्षेतही यश मिळविले आहे.
तसेच झरना शाह हिने ६0८, इशांत गुप्ता याने ६0७, आदिती कासट हिने ५९३, शुभम रंगभाळ ६00, अनिमेष जैन याने ५९४, उर्वशी लोहिया ५८५, रूचिक तिवारी ५७६, मोहित काकड ५५६, मानसी मनवर ५४९, कल्याणी मालसने ५४३, अतुल सोळंकी ५२६, रंगोली साव ५१६, राजश्री सोमाणी ५१५, योगेश परिहार ५११, वैष्णवी तडस ५१५, तेजस जोगी ५११, राजलक्ष्मी कोरपे ५0४ यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. यासोबतच शरद वैराळकर याने ३८६ गुण प्राप्त करीत एनटी बी प्रवर्गातून राज्यातून १६ वे स्थान प्राप्त केले