महाविद्यालयात विद्यार्थिनीची छेडखानी
By Admin | Updated: October 4, 2016 02:26 IST2016-10-04T02:26:19+5:302016-10-04T02:26:19+5:30
विद्यार्थिनीची ग्रंथपालानेच छेडखानी केल्याचा प्रकार घडला.

महाविद्यालयात विद्यार्थिनीची छेडखानी
अकोला, दि. ३- सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका महाविद्यालयात विद्यार्थिनीची ग्रंथपालानेच छेडखानी केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी विद्यार्थिनीने सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन गाठले; मात्र शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकार्यांनी हे प्रकरण तत्काळ आपसात मिटविले. सिव्हिल लाइन्स रोडवरील एका मोठय़ा शैक्षणिक संस्थेच्या महाविद्यालयात एक महिन्यापूर्वी एका विद्यार्थिनीची छेडखानी करण्यात आली होती. सदर विद्यार्थिनीने या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी विशाखा समितीची माहिती घेतली असता महाविद्यालयात विशाखा समितीच कार्यरत नसल्याचे समोर आले. त्यानंतर याच महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या आणि याच शैक्षणिक संस्थेच्या दुसर्या महाविद्यालयातील ग्रंथालयात दुसर्या विद्यार्थिनीची गत आठवड्यात छेडखानी करण्यात आली. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी विद्यार्थिनी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली; मात्र हा प्रकार शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकार्यांना माहिती पडताच त्यांनी विद्यार्थिनीची समजूत काढून प्रकरण आपसात मिटविले.