छेडखानीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

By Admin | Updated: August 17, 2015 01:22 IST2015-08-17T01:22:53+5:302015-08-17T01:22:53+5:30

तेल्हारा तालुक्यातील घटना.

Student suicide due to molestation | छेडखानीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

छेडखानीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

हिवरखेड (जि. अकोला): विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. छेडखानीला कंटाळूून या विद्यार्थिनीने ६ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले होते. तिचा ७ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला असून, तब्बल नऊ दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
इयत्ता ११वीत शिकणार्‍या या विद्यार्थिनीची एक युवक नेहमीच छेड काढत होता. गत आठवड्यात या युवकाने विद्यार्थिनीच्या घरात घुसून छेडखानी केली होती. त्याला पकडण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. मात्र तो फरार होण्यास यशस्वी झाला. या विद्यार्थिनीने ६ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले. तिला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिच्या ७ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर शनिवारी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्याने पोलिसांनी तोशिक मुर्तजा पिंजारी (वय २२, रा. इंदिरानगर) विरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: Student suicide due to molestation