शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

शिष्यवृत्तीच्या मुद्यावर विद्यार्थी आक्रमक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:51 AM

अकोला : गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती अद्याप  मिळाली नसल्याच्या मुद्यावर विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत,  रखडलेली शिष्यवृत्ती तातडीने विद्यार्थ्यांना देण्यात यावी, या  मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर  धडक दिली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात  आले.

ठळक मुद्देप्रभाव लोकमतचारखडलेली शिष्यवृत्ती तातडीने विद्यार्थ्यांना द्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती अद्याप  मिळाली नसल्याच्या मुद्यावर विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत,  रखडलेली शिष्यवृत्ती तातडीने विद्यार्थ्यांना देण्यात यावी, या  मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर  धडक दिली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात  आले.शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती वाटपात ‘ई-शिष्यवृत्ती’ संकेतस्थळ (वेबसाइट) गत  एप्रिलपासून बंद करण्यात आल्याने, राज्यातील ३५ जिल्हय़ांत १0  लाख ५७ हजार ५४१ विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्तीचे वाटप करण्याची  प्रक्रिया गत चार महिन्यांपासून रखडली आहे. याबाबतचे वृत्त   शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात  आले, हे येथे उल्लेखनीय. अनुसूचित जाती, विशेष मागासवर्ग  प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व इतर मागासवर्ग प्रवर्गातील  विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.  शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप  करण्यात येते; परंतु सन २0१६-१७ च्या शैक्षणिक सत्रात  शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, अकोला  जिल्ह्यासह राज्यातील १0 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांंना अद्यापही  शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. ई-शिष्यवृत्ती संकेतस्थळ  (वेबसाईट) गत एप्रिलपासून बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांंवर  शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.  यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असले, तरी शिष्यवृत्ती मिळाली  नसल्याने, अनेक विद्यार्थ्यांंना अडचणींचा सामना करावा लागत  आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांंना ता तडीने शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करीत विद्या र्थ्यांंनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत, मागणीचे निवेदन  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षकांना सादर करण्यात आले.  यावेळी भारिप-बमसंचे पराग गवई यांच्यासह रवी पाटील, आकाश  अहिरे, अमित मोरे, भूषण खंडारे, सुबोध पाटील, विशाल वाघ,  सागर खंडारे, विशाल गोपनारायण, अंकित गोपनारायण, राहुल  खंडारे, अमीत तेलगोटे, नितीन डोंगरे, सागर मेश्राम, भाऊसाहेब  अंभोरे, विशाल दुपारे, प्रवीण फुलके, गौरव चव्हाण, आशिष  वंजारे, सचिन चव्हाण, नागेश अंभोरे, अजित जठार व इतर विद्या र्थी उपस्थित होते.

..तर तीव्र आंदेलन!शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील विद्या र्थ्यांंना तातडीने शिष्यवृत्ती देण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन  छेडण्यात येणार असल्याचा इशारही विद्यार्थ्यांंच्यावतीने  जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात  आला आहे.