दहावीत नापास; विद्यार्थिनीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:01 IST2019-06-09T14:01:08+5:302019-06-09T14:01:11+5:30
अकोला : इयत्ता दहावीत नापास झाल्याने तारफैल परिसरातील एका विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी घडला.

दहावीत नापास; विद्यार्थिनीने घेतला गळफास
अकोला : इयत्ता दहावीत नापास झाल्याने तारफैल परिसरातील एका विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
शनिवारी इयत्ता दहावीचा निकाल आॅनलाइन जाहीर झाला; मात्र निकाल नापासचा आल्याने तारफैल स्थित सिद्धार्थवाडी येथील रहिवासी संजना श्रावण नावलकर (१६) ही विद्यार्थिनी नैराश्यात गेली. या नैराश्यातून तिने शनिवारी दुपारच्या २ वाजताच्या सुमारास घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी संजनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.