मारहाण करून रोकड पळविली
By Admin | Updated: January 23, 2016 01:55 IST2016-01-23T01:55:30+5:302016-01-23T01:55:30+5:30
टॉवर चौकातील घटना, मुलाच्या उपचाराची होती रक्कम.

मारहाण करून रोकड पळविली
अकोला: शहरातील टॉवर चौक परिसरातील एका रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या मुलाच्या उपचारासाठी आणलेली २५ हजार रुपयांची रोकड चार ते पाच जणांनी मारहाण करून पळविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी टॉवर चौकामध्ये घडली. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मूर्तिजापूर येथील रहिवासी शेख नौशाद शेख इब्राहिम यांच्या मुलावर टॉवर चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी अधिक पैशाची गरज असल्याने त्यांनी मूर्तिजापूूर येथून जुळवाजुळव करून २५ हजार रुपये आणले. मध्यवर्ती बस स्थानकावर उतरल्यानंतर ते रोकड घेऊन रुग्णालयात जात असताना पाच ते सहा जणांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर सदरची रोकड लंपास केली. त्यांनी या प्रकरणाची तक्रार रामदासपेठ पोलीस ठाण्यात केली; मात्र वृत्त लिहिपर्यंंत पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.