लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागाला मारण्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. मात्र, रविवारी एका नागाला जीवनदान मिळण्यासाठी अनेकांची धड पड दिसून आली. अकोल्यातील सर्पतज्ज्ञ बाळ काळणे आणि समाजसेवकांच्या पुढाकाराने नागाला वाचविण्याचा प्रयोग झाला.रविवार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उमरी परिसरात नाग आणि मुंगूसमध्ये संघर्ष सुरू झाला. पाहता-पाहता हा संघर्ष रस् त्यावर आला. परिसरातील नागरिकांनी थांबून नाग-मुंगूसमधील संघर्ष प्रत्यक्ष अनुभवला. दरम्यान, नागरिकांची गर्दी आणि हल्लाकल्ला ऐकून नाग आणि मुंगूसमधील संघर्ष अर्धवट राहिला. मुंगूस घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, या घटनेत नाग गंभीर जखमी झाल्याने त्याला सरपटता येईना. ही अवस्था पाहून परिसरातील सर्पमित्र रोशन काकडे यांनी नागास पकडले. त्यानंतर प्रशांत बुले, वन विभागाचे मानद वन्य जीव रक्षक आणि सर्पतज्ज्ञ बाळ काळणे यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर तातडीने पशुवैद्यक डॉ. गोपाल मंजूळकर यांना बोलावून नागावर उपचार सुरू झालेत. निसर्गातील प्रत्येक वन्य जीवाचे रक्षण करून त्याला जगण्याचा अधिकार द्यावा, असे आवाहनही येथे बाळ काळणे यांनी केले.
जखमी नागाला वाचविण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:34 IST
अकोला : नागाला मारण्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. मात्र, रविवारी एका नागाला जीवनदान मिळण्यासाठी अनेकांची धड पड दिसून आली. अकोल्यातील सर्पतज्ज्ञ बाळ काळणे आणि समाजसेवकांच्या पुढाकाराने नागाला वाचविण्याचा प्रयोग झाला.
जखमी नागाला वाचविण्याची धडपड
ठळक मुद्देउमरी येथील घटना सर्पतज्ज्ञ व समाजसेवकांचा पुढाकार