कावड यात्रेसाठी तगडा बंदोबस्त
By Admin | Updated: September 7, 2015 01:48 IST2015-09-07T01:48:34+5:302015-09-07T01:48:34+5:30
राजराजेश्वर पालखी कावड यात्रा महोत्सवासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे सोमवारी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात.

कावड यात्रेसाठी तगडा बंदोबस्त
अकोला - राजराजेश्वर पालखी कावड यात्रा महोत्सवासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे सोमवारी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कावड यात्रा मार्गावरील वल्लभनगर ते राजराजेश्वर मंदिरापर्यंत ८ झोन व १७ सेक्टर कार्यान्वित करण्यात आले असून, यामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
राजराजेश्वर कावड पालखी यात्रा महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच या कावड यात्रेला गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाद्वारे पूर्ण खबरदारी घेण्यात आली असून, संपूर्ण शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, एक शहर पोलीस उपअधीक्षक, ११ पोलीस निरीक्षक, ३६ पीएसआय, ५0६ पोलीस कर्मचारी, ५६ महिला पोलीस कर्मचारी, १२५ महिला होमगार्ड, ५0६ पुरुष होमगार्ड, एक एसआरपीची प्लाटून व एक आरसीपीची प्लाटून तैनात करण्यात आली आहे. वल्लभनगर ते राजराजेश्वर मंदिरापर्यंत सुमारे १४00 अधिकारी-कर्मचारी तैनात राहणार असून, प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना ठरवून दिलेल्या हद्दीत कार्यरत राहावे लागणार आहे.