अकोल्यात गणेशोत्सवादरम्यान कडेकोट बंदोबस्त
By Admin | Updated: September 7, 2014 01:32 IST2014-09-07T01:32:16+5:302014-09-07T01:32:16+5:30
वॉच टॉवर : ठिकठिकाणी उभारले सुरक्षा कठडे

अकोल्यात गणेशोत्सवादरम्यान कडेकोट बंदोबस्त
अकोला : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर पोलिस प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्व पोलिस ठाण्यांतर्गत सर्व भागातून प थसंचलन केले. गणेश विसर्जनासाठी प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. बंदोबस् ताचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी पोलिस मुख्यालयात तालिम घेण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणुकीत जमणारी गर्दी लक्षात घेता, पोलिस प्रशासन कॅमेर्यांनी नजर ठेवण्यासोबतच मोटारसायकलींची गस्त घालणार आहे. तसेच ठिकठिकाणी सुरक्षा कठडे व वॉच टॉवर उभारण्यात येणार आहेत. पोलिस बंदोबस्तासाठी प्रशासनाने शहरातील गांधी चौक, जयहिंद चौक, गुलजारपुरा, ताजनापेठ चौक, सुभाष चौक, दीपक चौक आदी परिसरात तगडा बंदोबस्त लावला आहे.
७८ फिक्स पॉईंट, ७ कॅमेरे
पोलिसांनी ८७ फिक्स पॉईंट लावले आहेत. या पॉईंटवर तगडा पोलिस बंदोबस्त लावून घडामोडींवर लक्ष राहील. सोबतच ७ कॅमेर्यांची नजर घडामोडींवर राहील.