शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

डमी उमेदवार आढळल्यास हाेणार कठाेर कारवाई; पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचा इशारा

By आशीष गावंडे | Updated: June 18, 2024 22:22 IST

जिल्हा पाेलिस दलात पाेलिस शिपाइ पदाच्या १९५ रिक्त जागांसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

अकाेला: जिल्हा पाेलिस दलातील १९५ रिक्त पदे भरण्यासाठी १९ जून पासून मैदानी चाचणी परीक्षेला प्रारंभ हाेणार आहे. निमवाडीस्थित पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर ही प्रक्रिया पार पडणार आहे. यादरम्यान, उमेदवारांनी डमी उमेदवार दिल्याचे आढळून आल्यास संबंधितांविराेधात कठाेर कारवाइ करण्याचा इशारा जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.

जिल्हा पाेलिस दलात पाेलिस शिपाइ पदाच्या १९५ रिक्त जागांसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये १६ हजार १६१ पुरुष उमेदवार, ५ हजार ६९१ महिला उमेदवार तसेच तृतीयपंथी पुरु पुरुष उमेवाराची संख्या एक आहे. उमेदवारांची मैदानी चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आदी प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली जाणार असल्याचे जिल्हा पाेलिस अधीक्षक सिंह यांनी स्पष्ट केले आहे. नियाेजनानुसार पुरुष व महिला उमेदवारांची परीक्षा घेण्यासाठी पाेलिस दलातील वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांची चमू कामाला लागली आहे. अत्याधुनिक उपकरणांचा वापरपदभरती प्रक्रियेत १०० मिटर, ८०० मीटर, व १६०० मिटर धावण्याची चाचणी पारदर्शक होण्यासाठी तसेच उमेदवारांची उंची व छाती मोजण्यासाठी तांत्रिक उपकरणांचा वापर केला जाणार आहे. बायाेमेट्रिक पध्दतीने उमेदवारांची ओळख केली जाइल. ही प्रक्रिया पारदर्शक व शिस्तप्रिय पध्दतीने होणार असून यासाठी ३० पोलिस अधिकारी व २३२ पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.उमेदवारांना मिळणार चार दिवसांची मुदतज्या उमेदवारांना पाेलिस पदभरतीसाठी एकाच दिवशी दोन ठिकाणी वेगवेगळ्या पदासाठी किंवा लागोपाठ मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणीसाठी तारीख देण्यात आली असेल, अशा उमेदवारांना एका ठिकाणची पडताळणी आटाेपल्यानंतर दुस-या जिल्हयात जाण्यासाठी किमान ४ दिवसांच्या अंतराने पदभरतीसाठी मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना अडचण असल्यास त्यांनी raunak.sarafa mahait.org यावर ईमेल करावा, असे जिल्हा पाेलिस अधीक्षक सिंह यांनी स्पष्ट केले. 

परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांनी काेणाच्याही आमिषाला, भुलथापांना बळी पडू नये. ही परीक्षा पारदर्शपणे राबवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून त्यावर आमची करडी नजर आहे. उमेदवारांनी प्रामाणीकपणे परीक्षेला सामाेरे जावे.- बच्चन सिंह, जिल्हा पाेलिस  अधीक्षक अकोला 

टॅग्स :Policeपोलिस