वादळ वाऱ्याने घरांची पडझड, टिनपत्रे उडाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:30+5:302021-06-18T04:14:30+5:30

तालुक्यासह शहरातील विविध भागात झालेल्या जोरदार वादळी पावसाने अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेली व घराच्या भिंती कोसळून अनेक जण ...

Storms blow down houses, tin sheets blown away! | वादळ वाऱ्याने घरांची पडझड, टिनपत्रे उडाली!

वादळ वाऱ्याने घरांची पडझड, टिनपत्रे उडाली!

तालुक्यासह शहरातील विविध भागात झालेल्या जोरदार वादळी पावसाने अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेली व घराच्या भिंती कोसळून अनेक जण बेघर झाले आहेत. शहरातील जुनी वस्ती भागात व गोरक्षण मागील रेल्वे लाईनला लागून असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मारोती चव्हाण यांच्या घराची भिंत कोसळून घरावरील टिनपत्रे उडून गेली. रात्रीच्या वेळी घरात सर्व कुटुंब झोपेत असताना हा प्रकार घडला. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. तसेच द्वारकाबाई सुदाम बाजड, संदीप गणेश शळके, सुखदेव खंडारे, विष्णू वानखडे यांच्याही घरावरील टिनपत्रे उडून गेली, तर जुनी वस्ती भागातील पंचशील वाडीतील अजवंता शामराव वानखडे, गणेश वानखडे यांचे घर कोसळल्याने शहरातील अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. अशा कुटुंबांना शासनाने तातडीचे अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी केली आहे.

फोटो:

Web Title: Storms blow down houses, tin sheets blown away!