अकोल्यात धनगर समाजाचा रास्ता रोको
By Admin | Updated: August 15, 2014 01:23 IST2014-08-15T01:14:43+5:302014-08-15T01:23:26+5:30
अकोला-नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

अकोल्यात धनगर समाजाचा रास्ता रोको
अकोला: धनगर जमातीस अनुसूचित जमाती (एस.टी.) चे प्रमाणपत्र वितरित करून अंमलबजावणी करण्याबाबत अकोला जिल्हा धनगर जमाती आरक्षण संघर्ष कृति समितीने गुरुवारी दुपारी अकोला-नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
महाराष्ट्र तसेच अकोला जिल्ह्यामधील धनगर जमातीला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण असूनही प्रमाणपत्र मिळत नाही. धनगर जमातीस प्रमाणपत्र वितरित करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तब्बल एक तास रास्ता रोको करण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी बळीराम चिकटे, काशीराम साबळे, सुमन गावंडे, पुष्पा गुलवाडे, मुकुंद भदे, नारायण ढवळे, एम. के. दिवनाळे, कैलास बचे, गोपाल गावंडे, संजय गाडगे, दीपक नागे, यशवंत नागे, विजय ढेंगे, बी. एस. खराटे, सुहास साबे, ज्ञानेश्वर सुलताने, गजानन अघडते, गणेश खराटे, वसंतराव सोनोने, कृष्णा जुमळे, गजानन भटकर, प्रशांत नागे, संतोष नागे, भाऊराव नागे, गोविंद नागे यांच्यासह धनगर समाजातील नागरिक उपस्थित होते