पाणीपट्टीची लूट थांबवा, उद्धवसेनेने महापालिकेत ठिय्या देत जाळली देयके
By नितिन गव्हाळे | Updated: May 7, 2024 21:14 IST2024-05-07T21:13:42+5:302024-05-07T21:14:06+5:30
उद्धवसेनेचे शहर प्रमुख, माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात अकोला शहराला महान येथील धरणातून पाणी पुरवठा होता. परंतु धरणाध्ये मुबलक प्रमाणात साठा असतानासुध्दा नियमित पाणी पुरवठा करण्यात येत नाही....

पाणीपट्टीची लूट थांबवा, उद्धवसेनेने महापालिकेत ठिय्या देत जाळली देयके
अकोला: महापालिकेच्या जलप्रदाय विभागामार्फत नागरीकांना अव्वाच्यासव्वा पाणीपट्टीची देयके देऊन लूट करण्यात येत आहे. ही लूट थांबवा, अशी मागणी करीत, उद्धवसेनेच्यावतीने मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शिवसैनिकांनी पाणीपट्टीची देयके जाळून महापालिकेचा निषेध नाेंदविला.
उद्धवसेनेचे शहर प्रमुख, माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात अकोला शहराला महान येथील धरणातून पाणी पुरवठा होता. परंतु धरणाध्ये मुबलक प्रमाणात साठा असतानासुध्दा नियमित पाणी पुरवठा करण्यात येत नाही. नियमीत पाणी पुरवठा करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असूनही चौथ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येतो. तसेच शहरांमध्येच शेकडो नागरीकांच्या नळांना मीटर बसविण्यात आलेले नाही. ज्यांनी नळांना मीटर बसविलेले आहेत, त्यांना स्वाती इंडस्ट्रीजकडून अव्वाचा सव्वा बिल देण्यात येत असल्याचा आरोप शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी केला आहे. अधिकच्या बिलामुळे नागरीकांना आर्थिक भुर्दंड सहन करून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आंदोलनात माजी नगरसेविका मंजुषा शेळके, उपजिल्हा प्रमुख अतुल पवनीकर, गजानन बोराळे, तरूण बगेरे, बबलु उके, संजय अग्रवाल, प्रकाश वानखडे, रोशन राज, राजेश कानपुरे, सतीश नागदेवे, देवा गावंडे, पंकज बाजोड, अनिल शुक्ला, दशरथ मिश्रा आदी सहभागी झाले होते.
१२०० ते १८०० प्रतिवर्ष प्रमाणे देयक घ्यावे
महापालिकेच्या जलप्रदाय विभागाकडून पाणीपट्टीचा कर यापुर्वी स्लम भागात रुपये १२०० रूपये इतर भागातील नागरीकांकडून १८०० रूपये प्रतिवर्षप्रमाणे बिल दिल्या जात होते. त्याचप्रमाणे पाणीपट्टी वसुली करण्यात यावी. तसेच ज्यांच्याकडे मीटर आहेत. त्या भागांमध्ये स्वाती इंडस्ट्रीजकडून मीटर रिडींग प्रमाणे देयके वाटप करण्याचीही मागणी उद्धवसेनेने केली आहे.