कापूस खरेदी बंद ; शेतकऱ्यांना प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:06+5:302021-01-13T04:47:06+5:30

आपातापा: ढगाळ वातावरण असल्यामुळे नाफेड केंद्रांतर्गत कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस पडून असल्याने ...

Stop buying cotton; Farmers wait! | कापूस खरेदी बंद ; शेतकऱ्यांना प्रतीक्षा!

कापूस खरेदी बंद ; शेतकऱ्यांना प्रतीक्षा!

आपातापा: ढगाळ वातावरण असल्यामुळे नाफेड केंद्रांतर्गत कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस पडून असल्याने खरेदी सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.

यंदा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी नाफेडअंतर्गत ऑनलाईन नोंदणीसुद्धा केली आहे. मात्र, गत दोन ते तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे नाफेडअंतर्गत खरेदी केंद्रात कापूस खरेदी २ जानेवारी २०२१ पासून बंद आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्या शेतकऱ्यांना खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. आपातापा नाफेड केंद्रांतर्गत यंदा कापूस खरेदी वाढली आहे. १७ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१ या दरम्यान खरेदी केंद्रात ४३५ शेतकऱ्यांच्या १२, ९३३ क्विंटल ४० किलो कापसाची खरेदी झाली आहे. दरम्यान, परिसरात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात असल्याने शेकडो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना नाफेड खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. (फोटो)

------------------

कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी

ढगाळ वातावरणामुळे बंद केलेली खरेदी पुन्हा सुरू करण्याची मागणी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून होत आहे.

---------------------

ढगाळ वातावरणामुळे कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे, पुढील आदेश येताच खरेदी सुरू करण्यात येईल.

-नागोराव देऊळकर, लिपिक, नाफेड केंद्र, आपातापा.

Web Title: Stop buying cotton; Farmers wait!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.