दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी

By Admin | Updated: September 8, 2015 02:29 IST2015-09-08T02:29:28+5:302015-09-08T02:29:28+5:30

कावडयात्रेदरम्स्यान झालेल्या दगडफेकीत महिला पोलीस कर्मचा-यासह तीन पोलीस कर्मचारी जखमी.

Stone rifle police personnel injured | दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी

दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी

अकोला - टिळक रोडवर कावड यात्रा सुरू असताना सिटी कोतवाली पोलिस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचार्‍यासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या तीन कर्मचार्‍यांनी काही कावडधारकांना पुढे चालण्यास सांगितल्यानंतर कुणीतरी त्यांच्या दिशेने दगड फेकला. टिळक रोडवर एक कावड बराचवेळ थांबली होती. दरम्यान, याचवेळी दोन युवकांमध्ये हाणामारी झाल्याने त्यांनी सदर कावड पुढे नेण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळात कैलास मोहरीर, विजय काकड यांच्या दिशेने कुणीतरी दगड फेकून मारल्याने पोलीस कर्मचार्‍यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. सदर पोलीस कर्मचार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीनही पोलीस कर्मचार्‍यांची प्रकृती चांगली आहे.

Web Title: Stone rifle police personnel injured