घुंगशी रोडवरून दारूचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:19 IST2021-05-11T04:19:06+5:302021-05-11T04:19:06+5:30

अकोला : मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या घुंगशी ते म्हैसांग रोडवर देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक ...

Stocks of liquor seized from Ghungshi Road | घुंगशी रोडवरून दारूचा साठा जप्त

घुंगशी रोडवरून दारूचा साठा जप्त

अकोला : मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या घुंगशी ते म्हैसांग रोडवर देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक व विक्री करीत असलेल्या एका इसमास पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने रविवारी रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घुंगशी ते म्हैसांग रोडवर घुंगशी येथील रहिवासी किसन हरिश्चंद्र चव्हाण वय ३३ वर्ष हा देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक व विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्या माहितीवरून त्यांनी सापळा रचून किसन चव्हाण यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी व दारू असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या पथकाने केली.

Web Title: Stocks of liquor seized from Ghungshi Road