एकजुटीने राहा, तरच निवडणुकीत यश मिळेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:20 IST2021-09-19T04:20:25+5:302021-09-19T04:20:25+5:30
आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर शनिवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात महानगर कार्यकारिणीच्या बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या बैठकीला अजित पवार ...

एकजुटीने राहा, तरच निवडणुकीत यश मिळेल!
आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर शनिवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात महानगर कार्यकारिणीच्या बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या बैठकीला अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. अमोल मिटकरी, पक्ष निरीक्षक प्रवीण कुंटे, महानगर अध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश संघटक मोहम्मद रफीक सिद्दिकी उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांसाेबत चर्चा केली. काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या असता पवार यांनी पक्षहिताच्या वाढीसाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केले. दरम्यान, महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी आजपर्यंत केलेल्या संपूर्ण कामकाजाचा अहवाल सादर केला असता त्यावर पवार यांनी समाधान व्यक्त केले. बैठकीला कार्याध्यक्ष सैयद युसूफ अली, नगरसेविका उषाताई विरक, नगरसेवक फैयाज खान, अब्दुल रहिम पेंटर, नितीन झापर्डे, माजी गटनेता मनोज गायकवाड, नगरसेविका सुषमा निचळ, माजी नगरसेवक दिलीप देशमुख, नकीर खान, अफसर कुरेशी, देवानंद ताले, बुढन गाडेकर, आदी उपस्थित होते.