शिक्षक सेनेचे राज्यव्यापी आंदोलन

By Admin | Updated: September 5, 2015 01:43 IST2015-09-05T01:43:37+5:302015-09-05T01:43:37+5:30

शिक्षकविरोधी धोरणाच्या निषेधार्थ शिक्षक सेनेचे धरणे.

Statewide movement of teachers army | शिक्षक सेनेचे राज्यव्यापी आंदोलन

शिक्षक सेनेचे राज्यव्यापी आंदोलन

अकोला : राज्य शासनाने शिक्षकांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. त्या अनुषंगाने शिक्षक सेनेच्या जिल्हा शाखेमार्फत जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज.मो. अभ्यंकर आणि राज्य सरचिटणीस पद्माकर इंगळे यांच्या आदेशानुसार शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे विविध मागण्या करण्यात आल्यात. यामध्ये शासनाच्या निर्णयानुसार महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करणे, १ नोव्हेंबर २00५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, २0 पेक्षा कमी पटसंख्या असणार्‍या शाळा सुरू ठेवाव्यात, १ ते ७ किंवा १ ते ८ पर्यंंत असणार्‍या शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे कायम ठेवावी, समायोजनापूर्वी पदोन्नतीची कार्यवाही करण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांकडील बीएलओचा भार काढण्यात यावा, शालेय पोषण आहार योजनेतून मुख्याध्यापक आणि शिक्षकांची मुक्तता करण्यात यावी, स्वच्छतागृह व खोली बांधकामाची रक्कम वजा करावी, एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी डिसेंबरपर्यंंत मुदतवाढ देण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांंंच्या गुणवत्ता सर्वेक्षण करणार्‍या संस्थेत शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांचा समावेश करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.

Web Title: Statewide movement of teachers army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.