राज्याचे ऊर्जामंत्री १८ मे रोजी पारस वीज केंद्रास भेट देणार!
By Admin | Updated: May 16, 2017 20:14 IST2017-05-16T20:14:12+5:302017-05-16T20:14:12+5:30
पारस : राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महानिर्मितीच्या पारस औष्णिक वीज केंद्राला १८ मे रोजी सायंकाळी भेट देणार आहेत.

राज्याचे ऊर्जामंत्री १८ मे रोजी पारस वीज केंद्रास भेट देणार!
पारस : राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महानिर्मितीच्या पारस औष्णिक वीज केंद्राला १८ मे रोजी सायंकाळी भेट देणार आहेत. ऊर्जामंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पारस वीज केंद्राला ही त्यांची पहिलीच भेट आहे.
पारसदीप प्रशासकीय इमारतीसमोरील भागात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या हेलिपॅडवर १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आगमन होणार असून, महानिर्मितीच्या प्रत्येकी २५० मेगावाट क्षमतेच्या संच क्रमांक ३ व ४ ची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यानंतर पारस वीज केंद्र सेवा इमारत येथे महानिर्मितीच्या मुख्यालयातील व पारस औष्णिक वीज केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत. १८ मे रोजी त्यांचा रात्रीचा मुक्काम पारस वीज केंद्र येथे नियोजित आहे. शुक्रवार, १९ मे रोजी सकाळी ८ वाजता ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे हेलिकॉप्टरने अकोल्याकडे प्रयाण करणार असल्याचे पारस औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी कळविले आहे.