राज्यात अद्यापही तुरळक पावसाचाच अंदाज

By Admin | Updated: July 17, 2015 01:46 IST2015-07-17T01:46:25+5:302015-07-17T01:46:25+5:30

विदर्भ, मराठवाडा कोरडाच.

In the state, there is still very little rain forecast | राज्यात अद्यापही तुरळक पावसाचाच अंदाज

राज्यात अद्यापही तुरळक पावसाचाच अंदाज

अकोला : पाऊस येण्यासाठीची प्रणाली अद्याप अशक्त आहे, पण येत्या २0 जुलैपर्यंत राज्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. २0 जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. दरम्यान, विदर्भात देवरी येथे मागील चोवीस तासांत गुरुवारी सकाळी ८.३0 वाजेपर्यंत १ से.मी. पावसाची नोंद झाली असून, उर्वरित विदर्भ कोरडाच आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यामध्ये पुणे परिसरात १९ जुलैपर्यंत हलका, तर २0 ते २२ जुलैपर्यंत मध्यम स्वरू पाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. १७ आणि १८ जुलै रोजी मुंबई आणि परिसरात याच पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरू पाचा पाऊस पडला. मराठवाड्यात मात्र हवामान कोरडे होते. गत चोवीस तासांत कर्जत, माथेरान येथे प्रत्येकी ३ से.मी. तर कोकण येथे २ से.मी., चिपळूण, दोडामार्ग, जव्हार, कुडाळ, मानगाव, मोखेडा, मुरू ड, पोलादपूर, केपे, तळा, तलासरी, उरण, वाडा व वाल्पोई येथे प्रत्येकी १ से.मी., मध्य महाराष्ट्रात इगतपुरी व महाबळेश्‍वर येथे १ से.मी. तर विदर्भात देवरी येथे १ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर लाम्हीणी येथे ४ से.मी. तर दावडी, शिरगाव येथे ३ से.मी., लोणवळा (टाटा), डुंगरवाडी येथे १ से.मी. पाऊस नोंदविण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मध्य वैतरणा व वैतरणा तलाव भागात १ से. मी. पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: In the state, there is still very little rain forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.