नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर राज्य सरकार खरेदी करणार! - पालकमंत्र्यांची ग्वाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 14:18 IST2018-05-15T14:18:50+5:302018-05-15T14:18:50+5:30
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी संपत असली तरी, आॅनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची तूर सरकारमार्फत खरेदी करण्यात येणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर राज्य सरकार खरेदी करणार! - पालकमंत्र्यांची ग्वाही!
अकोला : ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी संपत असली तरी, आॅनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची तूर सरकारमार्फत खरेदी करण्यात येणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
‘नाफेड’मार्फत जिल्ह्यात गत २ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली; मात्र खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात आलेली तूर साठणुकीसाठी वखार महामंडळाच्या जिल्ह्यातील गोदामांमध्ये जागा उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी संथगतीने करण्यात येत आहे. तूर खरेदीसाठी जिल्ह्यात ३१ हजार ७१६ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असून, त्यापैकी १४ मे पर्यंत ७ हजार २२७ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित २४ हजार ४८९ शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे. ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीची मुदत १५ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पृष्ठभूमीवर नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर खरेदी करण्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. तथापि मुदतवाढ मिळण्यास विलंब झाल्यास, जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या मात्र खरेदी बाकी असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांची तूर राज्य सरकारमार्फत खरेदी करण्यात येणार आहे, असेही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.