शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मुलांसाठी आनंदी वर्ग सुरू; वीटभट्टीच्या ठिकाणी सुरू झाली शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:29 IST

कुरूम : मूर्तिजापूर पं.स. अंतर्गत कुरुम येथील समूह साधन केंद्रात  ६ फेब्रुवारीला वीटभट्टीवर काम करणार्‍या स्थलांतरित पालकांच्या मुलांच्या आनंदी वर्गाचे उद्घाटन मूर्तिजापूर पं.स.चे उपसभापती उमेश मडगे यांच्या हस्ते पार पडले.

ठळक मुद्देशाळाबाह्य व स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूम : मूर्तिजापूर पं.स. अंतर्गत कुरुम येथील समूह साधन केंद्रात  ६ फेब्रुवारीला वीटभट्टीवर काम करणार्‍या स्थलांतरित पालकांच्या मुलांच्या आनंदी वर्गाचे उद्घाटन मूर्तिजापूर पं.स.चे उपसभापती उमेश मडगे यांच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डीआयसीपीईडीचे माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ अधिव्याख्याता सोनारे, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, कुरुम केंद्रप्रमुख प्रवीण रोकडे उपस्थित होते. जानेवारी २0१८ मध्ये तालुका स्तरावर शाळाबाह्य, स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत यांनी केले होते. त्या अनुषंगाने कुरुम केंद्रांतर्गत परिसरात सर्वेक्षण केले असता मधापुरी फाटा येथील अंकुश खोपे यांच्या वीटभट्टीवर ६ ते १४ वयोगटातील सात विद्यार्थी असल्याचे आढळले. या विद्यार्थ्यांना लगेच जि.प. मुलांची शाळा कुरुम , जि.प. कन्या शाळा कुरुम, जि.प. शाळा मधापुरी येथे दाखल करण्यात आले. परंतु वीटभट्टीपासून तीनही शाळा दोन कि.मी. अंतरावर असल्याने हे विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित राहत नव्हते. परिणामी सर्व विद्यार्थी शाळाबाह्य राहणार होते. ही बाब लक्षात घेऊन वीटभट्टी मालक अंकुश खोपे यांच्याशी संपर्क करून हंगामी वर्ग सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली व एक खोली उपलब्ध करून घेतली. या वर्गाकरिता एका स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली. त्याचे मानधन लोकवर्गणीतून करण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांना गणवेश व पाठय़पुस्तके केंद्रांतर्गत शाळेमधून व काही शिक्षक सहकार्‍यांच्या मदतीने पुरविणे शक्य झाले. अशा या आनंदी वर्गाचे ६ फेब्रुवारीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रीतसर उद्घाटन करण्यात आले. या कार्यात वीटभट्टी मालक अंकुश खोपे, जि.प. कन्या शाळा कुरुम येथील सहायक अध्यापक अजय मसनकर, जि.प. कन्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश गावंडे, बालरक्षक मो. ई. अली, मूर्तिजापूर गट साधन केंद्राचे विशेष शिक्षक रणजित सुरवाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. या वर्गाकरिता गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. 

चिखलदरा, मध्य प्रदेशेतील मुले आढळली शाळाबाह्यसर्वेक्षणात आढळलेल्या सात शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये गौरी गणेश कासदेकर वर्ग ४ था, गजली गणेश कासदेकर वर्ग १ ला, सोनुकुमार सोमा कासदेकर वर्ग ५ वा, राजकुमार सोमा कासदेकर वर्ग ३ रा सर्व रा.जामली ता.चिखलदरा जि.अमरावती, श्याम लक्ष्मण जांबेकर वर्ग ७ वा रा. मोरगळ ता. अंजनगाव सुर्जी जि.अमरावती, सन्निलाल तेलाराम दरसंबा वर्ग ४ था रा. माकाताबा जि.छिंदवाडा मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणStudentविद्यार्थी