श्रींच्या प्रकटदिनानिमित्त यागास प्रारंभ
By Admin | Updated: February 6, 2015 02:09 IST2015-02-06T02:09:21+5:302015-02-06T02:09:21+5:30
श्री संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त महारुद्र स्वाहाकार याग; ११ फेब्रुवारीला पूर्णाहूती.

श्रींच्या प्रकटदिनानिमित्त यागास प्रारंभ
शेगाव : श्री संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त बुधवार, ४ फेब्रुवारीला येथील श्रींच्या मंदिरात महारुद्र स्वाहाकार यागास सुरुवात झाली. राक्षसभुवन येथील ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रोपच्चारात हा यागास प्रारंभ झाला. याप्रसंगी ह्यश्रींह्णचे भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. प्रकटदिन सोहळ्यासाठी संतनगरीत भजनी दिंड्याचे आगमन सुरु झाले असून, ११ फेब्रुवारीला महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहूती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळय़ासाठी संस्थानच्यावतीने जय्यत तयारी केली आहे.