घाटपुरी येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामास प्रारंभ

By Admin | Updated: May 12, 2014 22:39 IST2014-05-12T00:03:18+5:302014-05-12T22:39:32+5:30

लोकमतने वृत्त प्रकाशित करताच ग्रामपंचायत प्रशासन खळबळून जागे

Start of work on water supply scheme at Ghatpuri | घाटपुरी येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामास प्रारंभ

घाटपुरी येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामास प्रारंभ

घाटपुरी : कंत्राटदाराचे देयक थकल्यामुळे येथील पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले होते. मात्र, या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच ग्रामपंचायत प्रशासन खळबळून जागे झाले. त्यानंतर या कामास तात्काळ सुरूवात करण्यात आली. त्यामुळे घाटपुरी येथील पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढण्यास मदत मिळणार आहे. या योजनेसाठी ग्रामपंचायतीला राज्य शासनाकडून निधीही देण्यात आला आहे. परंतु, हा निधी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने संबधीत कंत्राटदाराच्या खात्यात वळता केला नसल्याने कंत्राटदाराने योजनेचे काम बंद केले होते. दरम्यान, कंत्राटदाराला ७५ टक्के रक्कम अदा केल्यानंतरही कंत्राटदाराने मुजोरी करीत काम बंद केले. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने संबधीत कंत्राटदाराला देयक अदा केले. तथापि, नागरिकांनी घेराव घातल्यानंतर दिलेले आश्‍वासन समिती अध्यक्षांनी पूर्ण केले.

Web Title: Start of work on water supply scheme at Ghatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.