आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धापूर्व सराव शिबिराला प्रारंभ

By Admin | Updated: October 13, 2015 23:45 IST2015-10-13T22:37:29+5:302015-10-13T23:45:08+5:30

१६ वर्षांखालील जिल्हा संघाची निवड होणार; मंगरूळपीर येथे होणार सामने.

Start of practice camp before Inter-district Cricket | आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धापूर्व सराव शिबिराला प्रारंभ

आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धापूर्व सराव शिबिराला प्रारंभ

अकोला : विदर्भ क्रिकेट संघटना अंतर्गत मंगरुळपीर (जि. वाशिम) येथे होणार्‍या १६ वर्षांखालील दोन दिवसीय अकोला विभाग आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेकरिता सराव शिबिराला मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर प्रारंभ झाला. रविवारी घेण्यात आलेल्या निवड चाचणीमधून १६ वर्षांखालील अकोला जिलचा संभाव्य क्रिकेट संघ निवडण्यात आला असून, हे खेळाडू स्पर्धापूर्व सराव शिबिरात सहभागी झाले आहेत. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर निवड समिती सदस्य परिमल कांबळे यांनी जिल्हाभरातून आलेल्या एकूण ६९ खेळाडूंची चाचणी घेतली. यामधून २१ खेळाडूंची स्पर्धापूर्व सराव शिबिराकरिता निवड करण्यात आली. या २१ खेळाडूंमधून अंतिम संघ निवडण्यात येईल. याप्रसंगी बाळापूर तालुका प्रतिनिधी नारायण गावंडे, सुमेध डोंगरे, अमित माणिकराव, पवन हलवणे उपस्थित होते. संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर १३ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत होत आहे. शिबिरामधून १५ खेळाडूंचा निवड अकोला जिल्हा क्रिकेट संघ निवडण्यात येईल, अशी माहिती विदर्भ क्रिकेट संघटनेचे संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.

*शिबिरात सहभागी खेळाडू

 वेदांत मुळे, साकेत दुतोंडे, ऋषीकेश लाहोळे, विक्रम विरवाणी, यश हिंगणे, स्वप्निल सिरसाट, सुजय माहोरे, संकेत डिक्कर, अदनान कमाल, आकाश राऊत, पीयूष सावरकर, अमन शुक्ला, मयूर रम, समीर डोईफोडे, यश ठाकरे, गणेश भोसले, करण सम्रितकर, संकेत चांडक, श्रीरंग व्यवहारे, सात्त्विक सातपुते, राखीव खेळाडू रोशन खंडारे, स्मित ठाकरे.

Web Title: Start of practice camp before Inter-district Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.