जिल्ह्यात हरभरा सोंगणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST2021-02-05T06:19:00+5:302021-02-05T06:19:00+5:30
ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या अकोला : जिल्ह्यात गत आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढला असून त्याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसून येत ...

जिल्ह्यात हरभरा सोंगणीला सुरुवात
ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या
अकोला : जिल्ह्यात गत आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढला असून त्याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसून येत आहे. थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागात शेकोटीचा सहारा घेताना दिसून येत आहेत.
गौरक्षण रोडवरील पथदिवे बंद
अकोला : शहरातील गौरक्षण रोड ते तुकाराम चौक दरम्यान पथदिवे बंद असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात अंधार पसरलेला असतो. हीच गत शहरातील विविध भागांतही दिसून येत आहे. तर काही भागांत दिवसाही पथदिवे सुरू असल्याचे दिसून येते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
प्लास्टिक पिशव्यांतील अन्न जनावरांसाठी धोकादायक
अकोला : शहरातील अनेक भागांतील कचराकुंड्यांमध्ये लोक प्लास्टिक पिशव्यांमध्ये शिळे अन्न टाकून देतात. मोकाट जनावरे हे अन्न प्लास्टिक पिशव्यांसह गिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा प्रकार मोकाट जनावरांसाठी धोकादायक ठरत आहे.
जीएमसीतील जुन्या पाण्याच्या टाक्यांना गळती
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील इमारतींवर जुन्या पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांना गळती लागल्याने येथील पाणी सतत गळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे डासांचाही प्रादुर्भाव झाला आहे. येथून जवळच लहान मुलांचा वॉर्ड असून हा प्रकार त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
शहर बगिचामध्ये वाढली गर्दी
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील शहर बगिचाच्या सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बगिचाचे सौंदर्यीकरण अकोलेकरांना आकर्षित करीत असून अनेक जण येथे गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील बहुतांश गर्दी ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे.
न्यू तापडिया नगरातील रस्त्याची दुरवस्था
अकोला : न्यू तापडिया नगरात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा मुख्य रस्ता खरपमार्गे जवळपासच्या ग्रामीण भागाला जोडणारा असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरू असते. त्यामुळे या मार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उड्डाणपुलामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
अकोला : डाबकी रोडसह न्यू तापडिया नगरात रेल्वे रुळावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे निर्माणकार्य सुरू आहे. या दोन्ही उड्डाणपुलांचे निर्माणकार्य संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य झाले आहे. वाहनधारकांना त्याचा त्रास होत असून अनेकांना डोळ्यांशी निगडित समस्या उद्भवत आहेत.