राज्यात सात ठिकाणी एकलव्य निवासी शाळा सुरू
By Admin | Updated: May 8, 2015 01:42 IST2015-05-08T01:42:59+5:302015-05-08T01:42:59+5:30
केंद्र शासनाने राज्य स्तरावर निवासी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

राज्यात सात ठिकाणी एकलव्य निवासी शाळा सुरू
अकोला : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांंना दज्रेदार शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या निवासी शाळा योजनेंतर्गत राज्यात सात ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंत एकलव्य निवासी शाळा चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आल्या आहेत. देशभरातील आदिवासी जातीच्या विद्यार्थ्यांंना चांगले शिक्षण मिळावे, या हेतूने केंद्र शासनाने राज्य स्तरावर निवासी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यात २00१ पासून आदिवासी विद्यार्थ्यांंसाठी नाशिक, ठाणे जिल्हय़ातील कांबळगाव, अमरावती जिल्हय़ातील चिखलदरा व नागपूर जिल्हय़ातील खैरीपरसोडा येथे इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंंत एकलव्य निवासी शाळा सुरू केल्या. योजनेच्या दुसर्या टप्प्यात २0१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून पिंप्रीसद्रोद्दिन, ता. इगतपुरी, जि. नाशिक, नंदूरबार, ता.जि. नंदूरबार, बोरगाव, ता. देवरी, जि. गोंदिया, तुमरगुंडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली येथे, तर वर्ष २0१५- १६ या शैक्षणिक वर्षापासून शेंडगाव (भातसानगर), ता. शहापूर, जि. ठाणे, अजमेर सौंदाने, ता. सटाना. जि. नाशिक व मावेशी (राजूर), ता. अकोले, जि. अहमदनगर या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या इयत्ता ६ वी ते १२ पर्यंंतच्या शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या सर्व शाळांमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांंना शिक्षण दिले जाईल. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात येईल. त्याशिवाय निवास, अंथरुण-पांघरुण, भोजन, गणवेश, पाठय़पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य मोफत पुरविले जाईल. या शाळांमध्ये ३0 मुले व ३0 मुली, अशा एकूण ६0 विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीत प्रवेश दिला जाईल. प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा घेऊन गुणानुक्रमानुसार विद्यार्थ्यांंची निवड करण्यात येणार आहे.