शिकवणी वर्गामध्ये विद्यार्थ्याला मारहाण
By Admin | Updated: September 28, 2014 23:35 IST2014-09-28T23:35:08+5:302014-09-28T23:35:08+5:30
बुलडाणा येथील एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षकाने विद्यार्थ्यास केली मारहाण.

शिकवणी वर्गामध्ये विद्यार्थ्याला मारहाण
बुलडाणा : शहरातील एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षकाने एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना आज २८ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी विद्यार्थ्यांंच्या वडिलाने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील चैतन्यवाडी परिसरातील पारडेज क्लासेस नावाने शिकवणी वर्ग सुरू आहे. यात आदित्य मधुकर डिडोळकर हा तीन वर्षांंपासून शिकवणीसाठी जातो. आज सकाळी वर्ग सुरू असताना काही विद्यार्थी हसले; मात्र या कारणातून शिक्षक दत्तात्रय पारडेज यांनी आदित्यला काठीने मारहाण केली. अशी तक्रार वडील मधुकर पुरुषोत्तम डिडोळकर यांनी शहर पोलिस स्टेशनला केली. या आधारे पोलिसांनी शिक्षक पारडेज यांच्यावर कलम ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.