चाकू घेऊन फिरणा-यास अटक

By Admin | Updated: June 25, 2017 08:34 IST2017-06-25T08:34:10+5:302017-06-25T08:34:10+5:30

धारदार चाकू घेऊन फिरणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली.

Stabbing with a knife arrested | चाकू घेऊन फिरणा-यास अटक

चाकू घेऊन फिरणा-यास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या इसमास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रमोद डोईफोडेयांच्या तक्रारीनुसार, हरिहरपेठेतील दशहरा नगरातील दीपक तारालाल साहू (३८) हा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बाजारपेठेत फिरणाऱ्या दीपक साहू याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे धारदार चाकू मिळून आला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

Web Title: Stabbing with a knife arrested