संपामुळे एसटी प्रवाशांचे हाल!

By Admin | Updated: December 18, 2015 02:22 IST2015-12-18T02:22:05+5:302015-12-18T02:22:05+5:30

संप यशस्वी करण्यासाठी आंदोलकांनी सोडली बसगाड्यांची हवा.

ST passengers due to collision! | संपामुळे एसटी प्रवाशांचे हाल!

संपामुळे एसटी प्रवाशांचे हाल!

अकोला: महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस (इंटक) ने वेतनवाढीसह इतर विविध मागण्या मान्य करण्यासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे गुरुवारी अकोल्यात प्रवाशांचे अतोनात हाल झाले. अकोल्यात आंदोलकांनी संप यशस्वी करण्यासाठी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे लोकवाहिनीच ठप्प झाली. रापममध्ये कार्यरत कर्मचार्‍यांच्या इंटक संघटनेने २५ टक्के वेतनवाढ, सातवा वेतन आयोग व इतर विविध मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे परिणाम अकोल्यातदेखील उमटले. रापमच्या अकोला विभागात (अकोला आणि वाशिम जिल्ह्यात) इंटकची सदस्यसंख्या ही पाचशेच्या आसपास आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी संप हे एक हत्यारच, असे मानणार्‍या इंटकच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी प्रथम जुन्या बस स्थानकावर उभ्या असलेल्या सहा बसच्या टायरची हवा सोडली. यावेळी आगारप्रमुखांसह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांंनी त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो विफल ठरला. याच धामधुमीत बस स्थानकातून बाहेर पडणार्‍या अकोला-छिंदवाडा बसकडे आंदोलनकर्त्यांंनी धाव घेतली. अचानक आलेला ताफा पाहून बसचालक अंबादास वानखडे यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना खासगी दवाखान्यात हलविण्यात आले.

Web Title: ST passengers due to collision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.