एसटी-मोटारसायकलची समोरासमोर धडक; दोन ठार

By Admin | Updated: May 4, 2015 01:16 IST2015-05-04T01:16:46+5:302015-05-04T01:16:46+5:30

धाडनाकाजवळील घटना; मृतकात काका-पुतण्याचा समावेश.

ST-motorbike faces face-to-face; Two killed | एसटी-मोटारसायकलची समोरासमोर धडक; दोन ठार

एसटी-मोटारसायकलची समोरासमोर धडक; दोन ठार

बुलडाणा : येथील रविवारच्या बाजारातील हरासीतील भाजी घेण्यासाठी शहराकडे येणार्‍या मोटारसायकलीस भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील दोन व्यक्ती ठार झाल्या. सदर घटना बुलडाणा शहराजवळील धाड नाका परिसरात ३ मे रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान घडली असून, मृतकात काका-पुतण्याचा समावेश आहे. बुलडाणा तालुक्यातील चांडोळ येथील रहिवासी अलताफ खान अय्युब खान (वय ३0) व रहीम खान मुनाफ खान (वय २२) हे दोन्ही काका-पुतण्या भाजी विक्रेते आहेत. रविवारी चांडोळ येथे आठवडी बाजार भरत असून, या बाजारात भाजी विक्री करायची असल्यामुळे बुलडाणा येथील हरासी म्हणून भाजी विकत घेण्यासाठी दोन्ही आज सकाळी एमएच २८, २७५८ या क्रमांकाच्या मोटारसायकलने बुलडाण्याकडे निघाले. दरम्यान, बुलडाणा शहरातील धाड नाका परिसरात बुलडाण्याहून चांडोळकडे जाणारी एमएच ४0, ८४१८ क्रमांकाच्या एसटी महामंडळाच्या बसचालकाने समोरून येणार्‍या मोटारसायकलीस जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकल बसच्या पुढच्या चाकात येऊन काही अंतरापर्यंत घासत गेली. त्यात मोटारसायकलवरील अलताफ खान अय्युब खान व रहीम खान मुनाफ खान दोन्ही घासत गेले. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी मृतकचा भाऊ अकरम खान अय्युब खान पठान यांनी दिलेल्या तक्रारीवरून एसटी चालक पंढरी भगवान पालकर (वय ४६) याच्याविरुद्ध भादंवि ३0४ अ, २७९, ४२७ व मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा दाखल करून बसचालकास अटक केली आहे.

Web Title: ST-motorbike faces face-to-face; Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.