अमेरिकेसह इग्लंड सिंगापूरमध्येही श्रींचा प्रकटदिन
By Admin | Updated: February 11, 2015 23:51 IST2015-02-11T23:51:03+5:302015-02-11T23:51:03+5:30
१४ फेब्रुवारी रोजी आयोजन; श्री संत गजानन महाराज अमेरिका परिवाराचा पुढाकार.

अमेरिकेसह इग्लंड सिंगापूरमध्येही श्रींचा प्रकटदिन
बुलडाणा : संत गजानन महाराज यांचा भक्त परिवार देशाच्या सिमा ओलांडून सातासमुद्रापार पोहचला आहे. परदेशात स्थायीक झालेल्या भारतीयांच्या नव्या पिढीला श्री गजानन महाराजांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या शिकवणीविषयी ओळख करून देण्याच्या उद्देशाने संत गजानन महाराज अमेरीका परिवारा या नावाने एक संस्था कार्यरत असुन या माध्यमातुन यंदा प्रथमच श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन जगातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी साजरा करण्यात आला आहे.
१४ फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज यांचा १३७ वा प्रकट दिन साजजार होत असुन हा सोहळा श्री गजानन महाराज अमेरीका परिवार या संस्थेतर्फे अमेरीकेसोबतच इंग्लड व सिंगापूर मध्येही होऊ घातला आहे.अमेरीकेतील सनि व्हेली, कॅलिफोर्निया (बे एरिया) तसेच बॉयटन बिच,बीच फ्लोरिडा व मॅरिंट्टा , जॉर्जिया, या तिन ठिकाणी तसेच इंग्लड मधील संदरलॅन्ड, , युके व सिंगापूर येथे ह्यश्रींच्याह्ण पट्रदिनाचा सोहळा श्री गजानन महाराज अमेरीका परिवार या संस्थेकडून होत आहे.
या सोहळ्यास कॅलिफोर्निया (बे एरिया) येथे सुमारे ३00 हून अधिक भक्त सहभागी होतील. प्रकट दिन उत्सवाची सुरुवात पॅसेफिक वेळेनुसार (पीएसटी) सकाळी १0 वाजता होईल. उत्तर अमेरिका खंडातील गजानन महाराज (शेगाव) यांच्या सर्व भक्तांशी संवाद साधून या कार्यक्रमांसाठी आमंत्रीत केले जाणार असल्याची माहिती गजानन महाराज अमेरीका परिवारच्या वतिने प्रसिद्ध दिली आहे.