९० व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी अकोला विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:23 IST2021-09-12T04:23:45+5:302021-09-12T04:23:45+5:30

अकोला क्रीडा प्रबोधनी के आंतरराष्ट्रीय बॉक्सर हरिवंश टावरी याने मुंबई उपनगरचे बॉक्सर शशिकांत यादवला हरविले. तसेच दुसरे राष्ट्रीय विजेता ...

Sports Academy Akola wins 90th state level boxing tournament | ९० व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी अकोला विजयी

९० व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत क्रीडा प्रबोधनी अकोला विजयी

अकोला क्रीडा प्रबोधनी के आंतरराष्ट्रीय बॉक्सर हरिवंश टावरी याने मुंबई उपनगरचे बॉक्सर शशिकांत यादवला हरविले. तसेच दुसरे राष्ट्रीय विजेता अजय पैदोर, मुहम्मद साहेल यांनी सुवर्ण पदक मिळविले. सचिन चव्हाणने रजत, अजहर अली, क्षितिज तिवारी, सुदर्शन येनकरने कांस्य पदक, रितिक तिवारी याने रजत पद प्राप्त केले. तसेच बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र क्रीडा प्रबोधनीचे बॉक्सर शेख रेहाने कांस्य पदक पटकाविले. या स्पर्धेत ३० बॉक्सरांनी भाग घेतला होता. टीमसोबत आदित्य मते, गजानन कबीर, आशिष मिश्रा, सैय्यद साद, शुभम चौधरी, राहुल तारापुरे आदी उपस्थित होते. राज्य क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा प्रबोधनी के प्राचार्य सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनात खेळाडूंनी भाग घेतला होता. क्रीडा विभाग प्रमुख आयुक्त ओमप्रकाश वकोरिया व बॉक्सिंग संघटनेने खेळाडूंचे कौतुक केले. महाराष्ट्र बॉक्सिंग असोशिएशनचे महासचिव डॉ.राकेश तिवारी यांनी संपूर्ण स्पर्धेच्या कालावधीत स्पर्धा यशस्वी करण्याचे योग्य नियोजन केले.

Web Title: Sports Academy Akola wins 90th state level boxing tournament