कुरूम येथे अहिंसा यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST2021-04-12T04:17:28+5:302021-04-12T04:17:28+5:30

यावेळी जैन गुरु आचार्य श्री.महाश्रमण यांचे भाविकांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. अहिंसा यात्रेदरम्यान आचार्य श्री.महाश्रमण हे ३ देश ...

Spontaneous welcome to Ahimsa Yatra at Kurum | कुरूम येथे अहिंसा यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

कुरूम येथे अहिंसा यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

यावेळी जैन गुरु आचार्य श्री.महाश्रमण यांचे भाविकांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

अहिंसा यात्रेदरम्यान आचार्य श्री.महाश्रमण हे ३ देश आणि भारतातील २० राज्यामध्ये पदयात्रा करीत आहेत. मूर्तिजापूर तालुक्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील हयातपुर येथे आगमन होताच, जैन गुरू आचार्य श्री.महाश्रमण यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अहिंसा यात्रेचे कुरूम येथे आगमन होताच आचार्य श्री.महाश्रमण यांचे कुरूम ग्राम पंचायतने सरपंच अतुल वाठ,उपसरपंच इम्रान खान,ग्रा.पं.सदस्यांनी स्वागत केले. तसेच सकल जैन समाज बांधवांच्या वतीने व पंचशील विद्यालय तथा जि.एम.टेकाडे कनिष्ठ महाविद्यालयाने सुद्धा स्वागत केले. याप्रसंगी माजी पं.स.सदस्य मोहन रोकडे,अकोला जिल्हा भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख,पो.पा.वसंत विरुळकर, संतोष शिरभाते, नितेश झिंझुवाडीया,राहुल राठी, अनंता विरुळकर, साथरोग अधिकारी संजय घाटे,पुरुषोत्तम अळसपुरे, सुशील खंडारे, सागर रामेकर, अखिल भटकर, योगेश फुरसुले, कुलदीप सदार उपस्थित होते.

फोटो:

Web Title: Spontaneous welcome to Ahimsa Yatra at Kurum