‘भारिप’च्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: September 3, 2015 01:33 IST2015-09-03T01:33:01+5:302015-09-03T01:33:01+5:30

व्यापारी प्रतिष्ठाने बंद, व्यवहारांवर झाला परिणाम.

Spontaneous response to 'Bandh' | ‘भारिप’च्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘भारिप’च्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला- केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी भारिप-बमसंने पुकारलेल्या बंदला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद राहिल्याने व्यवहारांवर परिणाम झाला. बंद शांततेत पार पडला. भारिप-बमसं, महाराष्ट्र लोकशाही आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदमध्ये बिल्डिंग पेंटर व बांधकाम मजूर असोसिएशन, घरेलू महिला कामगार संघटना, अकोला जिल्हा श्रमिक संघ, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, महिला व पुरुष कामगार शाखा, कृषी उत्पन्न बाजार समिती, पदवीधर अंशकालीन संघटना, कामगार कल्याण संघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने प्रतिष्ठाने बंद ठेवली. या बंदमध्ये भारिप-बमसंचे कार्याध्यक्ष काशीराम साबळे, महासचिव अश्‍विजित सिरसाट, जि.प. अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, गजानन गवई, अशोक सिरसाट, सुभाष रौंदळे, सम्राट सुरवाळे, जीवन डिगे, वंदना वासनिक, अरुंधती सिरसाट, शोभा शेळके, दिनकर नागे, मनोहर शेळके, राजुमिया देशमुख, विलास जगताप, बळीराम चिकटे, आसिफ खान, नितीन जाधव, गजानन गवई, गौतम सिरसाट, अशोक देवर, सिद्धार्थ सिरसाट, डॉ. प्रसन्नजित गवई आदींसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Spontaneous response to 'Bandh'