खर्च केला अपार, भुईमुगाच्या झाडाला शेंगा मात्र चार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST2021-05-05T04:30:38+5:302021-05-05T04:30:38+5:30
पातूर : रबी हंगामातील भुईमूग, कांदा, हरभरा पिकाच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे माल विक्री करता येईना. त्यात ...

खर्च केला अपार, भुईमुगाच्या झाडाला शेंगा मात्र चार!
पातूर : रबी हंगामातील भुईमूग, कांदा, हरभरा पिकाच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे माल विक्री करता येईना. त्यात यंदा भुईमूग पिकाकडून आशा होती; परंतु भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येत आहे. अफाट खर्च करूनही भुईमूग पिकाचे उत्पादन अल्प होत असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, मूग, पिकाने पाठ फिरिवली असताना, रबी हंगामातील भुईमूग या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता. मात्र, या भुईमुगाचे बियाणे काही प्रमाणात बोगस निघाले. भुईमूग पिकाच्या झाडांना फक्त तीन ते चारच शेंगा लागल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्च निघणेही कठीण झाले आहे. पेरणी, फवारणी, खत या खर्चाच्या तुलनेत भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे, तसेच सद्य:स्थितीत जमिनीतील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाल्यामुळे भुईमूग पीक वाळत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा फटका बसणार आहे, तसेच कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊननेसुद्धा रबी हंगामातील पिकाच्या मालाची विक्री करण्यातसुद्धा अडचणी निर्माण होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
फोटो :
यंदा भुईमूग पिकाची पेरणी केली असून, सद्य:स्थितीत भुईमूग पिकाला तीन-चारच शेंगा असल्याने यावर्षी केलेला खर्च निघणेही कठीण दिसत आहे. शासनाने त्वरित भुईमूग पिकाचे सर्वेक्षण करून मदतीचा हात द्यावा.
-राहुल वानखडे, भुईमूग उत्पादक, शेतकरी नांदखेड