अकोटच्या अंध धनश्रीचे नेत्रदीपक यश

By Admin | Updated: June 14, 2017 00:16 IST2017-06-14T00:16:10+5:302017-06-14T00:16:10+5:30

दहावीच्या परीक्षेत डोळस विद्यार्थ्यांमधून ९५ टक्के गुण

The spectacular achievement of Akat Dhanashree of Akot | अकोटच्या अंध धनश्रीचे नेत्रदीपक यश

अकोटच्या अंध धनश्रीचे नेत्रदीपक यश

विजय शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : सुर्योदय आणि सूर्यास्त कधी पाहिला नाही अशा दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या अकोटच्या धनश्री हागे या मुलीने शिक्षणात मात्र इंद्रधनुष्याचे रंगाची उधळण करीत नेत्रदीपक यश मिळविले आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत डोळस शाळेत शिकत तिने दहावीच्याच्या परीक्षेत ९५ टक्के गुण प्राप्त केले. जिद्द, संघर्षाने डोळे नसतांनाही संपूर्ण राज्यात तिने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
अकोट येथील जलतारे प्लॉट येथील सोनल व अशोक हागे यांची मुलगी धनश्री ही जन्मतच अंध आहे. धनश्रीच्या दोन्ही डोळ्यात रेटीना बनलेला नसल्याने तिच्यावर कोणताही उपचार करुन जग पाहता आले नाही, मात्र तिच्या संवेदनेने अलौकिकतेचे दर्शन घडावे असे कृर्तत्व घडविले आहे. आई-वडिलांच्या सहकार्याने धनश्री पहिल्या वर्गापासूनच सर्वसामान्य डोळस विद्यार्थ्यांसोबत शिकून प्रथम येत गेली. अकोट येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोणत्याही अंध विद्यालयात व ब्रेल लिपीच्या माध्यमातून न जाता स्थानिक नरसिंग विद्यालयामध्ये आठव्या वर्गात प्रवेश घेतला. कुठल्याही प्रकारचा कमीपणा न वाटू देता तिने वर्षभर जिद्दीने अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेत तिने लेखनिक घेऊन सर्व पेपर सोडविले. त्यामध्ये तिला ९४.८० टक्के असे घवघवीत यश मिळाले आहे. तिला सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण आहेत. एकुण ५०० पैकी ४७४ गुण प्राप्त केले आहेत. दहावीच्या अभ्यासक्रमाच्या रेकॉर्डींग सिडी ऐकून नंतर पाठांतर करुन घेण्याकरिता आई-वडिलांनी मेहनत घेतली. दररोज तीन तास अभ्यास करुन घेणे, शाळेत सोडणे, आणणे आदींसह तिला सर्वतोपरीने मदत करीत गेल्याने मला कधीही आपण अंध असल्याचा आभास झालास नसल्याचे धनश्रीने सांगितले. तिला शिक्षकांनी सुध्दा चांगले मार्गदर्शन केले. धनश्री संगित विशारद मध्ये गायनाच्या माध्यम पूर्ण परीक्षेस बसली आहे. तिला गायन, संगित व नृत्याची आवड आहे. अतिशय बोलकी असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिकत असतांना, वावरत असतांना तिला कधी आपण अंध असल्याचे जाणवले नाही.

धनश्रीला व्हायचंय जिल्हाधिकारी
दोन्ही डोळ्यांनी अंध असली तरी माझा आत्मविश्वास डोळस आहे. कला विभागात प्रवेश घेऊन मला युपीएससी करुन जिल्हाधिकारी व्हायचं आहे. माझ्याच सारख्या अनेक अंध मुली व समाजाची सेवा करायची आहे. माझ्या यशाकरिता आई, वडील व शिक्षकांनी प्रेरणा दिल्याने आपण हे यश संपादीत केले आहे. जगात अशक्य काहीही नाही मनात ध्यास जर घेतला तर आपले ध्येय निश्चितच गाठता येते असा संदेश धनश्रीने लोकमतशी बोलतांना दिला.

Web Title: The spectacular achievement of Akat Dhanashree of Akot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.