शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ७४ आंतरराष्ट्रीय शाळांमधील ९00 शिक्षकांना विशेष प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:27 IST

जिल्हा परिषदेच्या ६0 आणि खासगी १४ शाळांमधील एकूण ९00 शिक्षकांना मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासंदर्भात विशेष प्रशिक्षण दिले.

अकोला: महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने मान्यता दिलेल्या राज्यातील जिल्हा परिषदेच्या ६0 आणि खासगी १४ शाळांमधील एकूण ९00 शिक्षकांना मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासंदर्भात विशेष प्रशिक्षण दिले. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्यांमध्ये देण्यात येणार आहे.डिजिटल शाळेसोबत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाºया शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देत, तेथील गुणवंत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतिक सुविधा, अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षक मिळावे, या दृष्टिकोनातून शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली. या मंडळाची संलग्नता देऊन आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देण्यासाठी मंडळाने आॅनलाइन अर्ज मागविले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने राज्यभरातून जिल्हा परिषदेच्या ६0 आणि १४ खासगी शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता दिली. या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने ठरविलेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण देता यावे, या दृष्टिकोनातून ७४ शाळांमधील जवळपास ९00 शिक्षकांना उन्हाळी सुटीमध्ये मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आठवडाभर विशेष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम कसा असेल, तो कसा शिकवायचा, मुलांना येणाºया अडचणी कशा ओळखायच्या, त्यांना शिक्षणासाठी कसे प्रोत्साहित करायचे, यासोबतच शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव विषय विस्तारित शिकविण्यात येणार आहे. या शाळांमध्ये कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यात येणार असल्याने, शिक्षकांना त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आले. (प्रतिनिधी)अकोला जिल्ह्यातून २0 शिक्षकांना प्रशिक्षणआंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या विशेष प्रशिक्षणामध्ये अकोला जिल्ह्यातील पाच जिल्हा परिषद शाळांमधून एकूण २0 शिक्षक सहभागी झाले होते. या सर्व शिक्षकांना पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. पहिली ते तिसºया वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राहणार आहे. इयत्ता चौथीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राहणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकSchoolशाळा