पंढरपूर यात्रा विशेष रेल्वेचे स्वागत
By Admin | Updated: June 29, 2017 20:02 IST2017-06-29T20:02:50+5:302017-06-29T20:02:50+5:30
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर येथे पंढरपूर यात्रा विशेष रेल्वेचे प्रथम आगमन होताच भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूरतर्फे स्वागत करून भाविकांनी शुभेच्छा देण्यात आल्या.

पंढरपूर यात्रा विशेष रेल्वेचे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर येथे पंढरपूर यात्रा विशेष रेल्वेचे प्रथम आगमन होताच भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूरतर्फे स्वागत करून भाविकांनी शुभेच्छा देण्यात आल्या.
आमदार हरीश मारोतीआप्पा पिंपळे यांच्या मार्गदर्शनात शहर अध्यक्ष भारत भगत, ज्येष्ठ कार्यकर्ता सतीशचंद्र शर्मा, नगरसेवक सचिन देशमुख, नगरसेवक संजय डागा, राहुल गुल्हाने, स्टेशन प्रबंधक देशमुख, मोहरीर, बांबल, पठाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वेचालक एस. वाय. कोहाडे व पी. एस. चंद्रा यांचे पुष्पहार, दुपट्टा, नारळ देऊन सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा वारकऱ्यांना सुलभ यात्रा उपलब्ध व्हावी, याकरिता रेल्वे प्रशासनाच्यावतीने पंढरपूर यात्रा विशेष रेल्वे प्रथम फेरी आज प्रारंभ करण्यात आली आहे. यावेळी रितेश सबाजकर, अविनाश यावले, धनंजय ढोक, बबलू भेलोंडे, संदीप जळमकर, गजानन नाकट, देवीदास गायगोले, संतोष भांडे, राजेंद्र हांडे, योगेश फुरसुले व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.