सोमवारपासून हावडा ते मुंबई दरम्यान विशेष रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:33 IST2020-12-13T04:33:21+5:302020-12-13T04:33:21+5:30

गाडी क्रमांक ०२२६० अप हावडा ते मुंबई ही विशेष गाडी १४ डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दररोज प्रस्थान स्टेशनहून दुपारी २ ...

Special train from Howrah to Mumbai from Monday | सोमवारपासून हावडा ते मुंबई दरम्यान विशेष रेल्वेगाडी

सोमवारपासून हावडा ते मुंबई दरम्यान विशेष रेल्वेगाडी

गाडी क्रमांक ०२२६० अप हावडा ते मुंबई ही विशेष गाडी १४ डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दररोज प्रस्थान स्टेशनहून दुपारी २ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी मुंबई स्टेशन येथे रात्री ०९.२० वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता येऊन ११.३५ वाजता मुंबईकडे रवाना होईल.

गाडी क्रमांक ०२२६० डाउन मुंबई ते हावडा ही विशेष गाडी १६ डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दररोज प्रस्थान स्टेशनहून सकाळी ६.०० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी १२.३० वाजता हावडा स्टेशन येथे पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दुपारी २.४५ वाजता येऊन २.५० वाजता हावडाकडे रवाना होईल.

२ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, २ द्वितीय आसन श्रेणी आणि एक पेंट्री कार अशी या विशेष गाडीची संरचना आहे.

पूर्णत आरक्षित असलेल्या या विशेष गाडीसाठी १२ डिसेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आरक्षण सेवा सुरू होईल.

केवळ कम्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची व प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि कोविड-१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Web Title: Special train from Howrah to Mumbai from Monday