विशेष पथकाचे तेल्हारा तालुक्यातील चार गावांतील जुगारांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:17 IST2021-05-22T04:17:33+5:302021-05-22T04:17:33+5:30

तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथे छापा टाकून सतीश मधुकर पवार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. ...

Special team raids gambling dens in four villages of Telhara taluka | विशेष पथकाचे तेल्हारा तालुक्यातील चार गावांतील जुगारांवर छापे

विशेष पथकाचे तेल्हारा तालुक्यातील चार गावांतील जुगारांवर छापे

तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथे छापा टाकून सतीश मधुकर पवार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर भांबेरी या गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून शरद भीमराव बोदडे (३१ वर्ष), सुरेश बालाजी बोदडे (५५), नितीन रामेश्वर उपराटे व बाबन बिंतूजी बोदडे (५५, सर्व रा. भांबेरी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर मनब्दा येथे छापा टाकून पंजाबराव साहेबराव तायडे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

त्यानंतर नेर या गावात विशेष पथकाने धाड टाकून ईश्वर किसन बावणे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून वरली मटका व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या आरोपींविरुद्ध तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Special team raids gambling dens in four villages of Telhara taluka