विशेष पथकाची दारू अड्ड्यांवर छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:17 IST2021-05-16T04:17:47+5:302021-05-16T04:17:47+5:30

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या चार ठिकाणांवर पोलीस अधीक्षक जी श्रीधर ...

Special squad raids liquor dens | विशेष पथकाची दारू अड्ड्यांवर छापेमारी

विशेष पथकाची दारू अड्ड्यांवर छापेमारी

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या चार ठिकाणांवर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने शनिवारी छापेमारी केली. या चारही जणांकडून दारूसाठा जप्त करण्यात आला असून, त्यांच्याविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड येथील रहिवासी उमेश मस्के हा दारूविक्री करीत असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी शनिवारी छापा टाकला. त्याच्याकडून दारूसाठा जप्त करण्यात आला. त्यानंतर मूर्तिजापूर बायपास रोडवरील मामाजीचा ढाबा, बार्शीटाकळी रोडवरील केजीएफ हॉटेल व हॉटेल राजे मल्हार या चार ठिकाणी विशेष पथकाने छापेमारी केली. या ठिकाणावरून उमेश दिनकर म्हस्के, राम पुंडलिक टापरे, गोविंद नारायण आठवले, वसंता सुखदेव दारोकार या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या चार जणांविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपाधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Special squad raids liquor dens