बेलखेड येथील जुगार अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST2021-05-15T04:17:31+5:302021-05-15T04:17:31+5:30
बेलखेड येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील ...

बेलखेड येथील जुगार अड्ड्यावर विशेष पथकाचा छापा
बेलखेड येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी सापळा रचून गुरुवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून विनोद रामकृष्ण भटकर वय ३८ वर्षे, विजय संतोष भटकर वय २३ वर्षे, प्रवीण गजानन गवई वय ३१ वर्षे व प्रशांत अनंतराव वासनकर वय ३९ वर्षे (सर्व राहणार बेलखेड) या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चौघांविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.