शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पथकाच्या छापेमारीत दारू अड्डे उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 15:08 IST

अकोला : बार्शीटाकली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघजळी, राजनदा आणि चिंचोली या तीन गावातील शेतात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू ...

अकोला : बार्शीटाकली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघजळी, राजनदा आणि चिंचोली या तीन गावातील शेतात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू हातभट्टी वर पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर यांनी पथकासह रविवारी दुपारी छापेमारी केली. या तीन गावातील  दारू अड्डे उध्वस्त करण्यात आले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बार्शीटाकळी पोलिसांच्या आशीर्वादाने या पोलिस स्टेशनच्या हद्दीतील राजंदा वाघजाडी आणि चिंचोली या तीन गावाच्या नदीपात्रात नदीपात्रात दारूच्या भट्ट्या सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर आणि पथकाने छापेमारी करून सदाशिव जाधव रा. वाघजाळी, नितीन पवार रा. वाघजाळी, उद्धव डाबेराव रा. चिंचोली, दुर्गासिंग राठोड रा. चिंचोली यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारू साठा आणि दारू बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.त्यानंतर सदाशिव जाधव आणि नितीन पवार रा वाघजाळी या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गावठी दारू साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. उद्धव डाबेराव आणि दुर्गासिंग राठोड या दोघांकडून दारूसाठ आणि गावठी दारू बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आला आहे. बार्शीटकली पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम जुगार अड्डे, गावठी दारू बनविनारे अड्डे सुरू असताना याकडे बार्शीटकली पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने या अड्ड्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली. पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर यांनी क्षणाचाही विलंब न करता बार्शीटाकळी तालुक्यातील या तीनही गावातील गावठी दारू अड्ड्यावर छापेमारी करून तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर आणि पथकाने केली

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळीPoliceपोलिस