विशेष संक्षीप्त मतदार यादी पुनरिक्षण, ११ हजार दावे, हरकती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:21 PM2018-10-15T13:21:05+5:302018-10-15T13:23:13+5:30

वाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत  ३१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १६ हजारांवर नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर १० हजारांवर मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

Special recruitment vistors list revision, 11 thousand claims, objections | विशेष संक्षीप्त मतदार यादी पुनरिक्षण, ११ हजार दावे, हरकती 

विशेष संक्षीप्त मतदार यादी पुनरिक्षण, ११ हजार दावे, हरकती 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत  ३१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १६ हजारांवर नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर १० हजारांवर मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. आता या पुरवणी छपाई करण्यासह अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी दावे आणि हरकती स्विकारण्यात येत असून, या अंतर्गत जिल्हाभरातून ११ हजार अर्ज दाखल झाले आहेत. 
जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत १ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली. तर १ सप्टेंबरपासून दावे व हरकती स्विकारण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्हाभरातून ११ हजार १८२ दावे आणि हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये मतदार यादीत नाव नसणे, नावात आणि पत्त्यामधील बदलांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. ही  ही मोहिम ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत चालणार असून,  त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. दावे आणि हरकती निकाली काढल्यानंतर ३ जानेवारीपूर्वी डाटाबेस अद्ययावतीकरण करून पुरवणी यादीची छपाई करण्यासह ४ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण १०४३ मतदान केंद्र असून, प्रत्ये मतदान केंद्रांवर बीएलओची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिपाई, अंगणवाडीसेविका, नगर परिषद कर्मचारी व शिक्षकांचा समावेश आहे.

 

Web Title: Special recruitment vistors list revision, 11 thousand claims, objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम