भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी आले विशेष विमान!

By Admin | Updated: October 21, 2014 00:32 IST2014-10-20T23:25:32+5:302014-10-21T00:32:45+5:30

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार मुंबईला रवाना.

Special aircraft for BJP's newly elected MLAs! | भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी आले विशेष विमान!

भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी आले विशेष विमान!

अकोला : विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यात सत्ता स्थापण्याची प्रथम संधी मिळणार आहे. त्या अनुषंगाने मुंबई येथे होणार्‍या भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहता यावे यासाठी जिलतील नवनिर्वाचित आमदारांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी सोमवारी विशेष विमान अकोल्यात आले होते. या विमानाने जिलतील चार आमदारांसह बुलडाणा व वाशिम जिलतील भाजपचे नवनिर्वाचित मुंबईला रवाना झालेत.
सत्ता स्थापनाच्या दृष्टिकोणातून विचारविनिमय करण्यासाठी भाजपची महत्त्वाची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील भाजपच्या आमदारांना तातडीने बोलावण्यात आले आहे. त्यांना वेळेत मुंबईला पोहोचता यावे यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. हे विमान सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास शिवणी विमानतळावर पोहोचले. त्यानंतर अकोला, वाशिम व बुलडाणा जिलंतील भाजपचे नवनिर्वाचित आमदारांना घेऊन विमान मुंबईकडे रवाना झाले. पहिल्या विमानाने खासदार संजय धोत्रे, भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, वाशिमचे आमदार लखन मलिक हे मुंबईकडे रवाना झालेत. दुसर्‍या विमानात आ. रणधीर सावरकर, खामगावचे आमदार आशीष पुंडकर, आ. संजय कुटे, आ. डॉ. रणजित पाटील यांच्यासह विदर्भ चेंबरचे अशोक गुप्ता, वसंत बाछुका, अशोक दालमिया मुंबईला रवाना झालेत.यावेळी विमानतळावर जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, डॉ. अशोक ओळंबे, महापौर उज्ज्वला देशमुख, विजय अग्रवाल, किशोर मांगटे, प्रवीण सावरकर, सागर शेगोकार, जयंत मसने, अँड. सुभाष ठाकूर, रावसाहेब कांबे, मनोज तायडे, संतोष झुनझुनवाला, ज्ञानेश्‍वर पोटे, बाळ टाले, हरिभाऊ काळे, गणेश पोटे, गिरीश गोखले, पवन पाडिया, छोटू गावंडे, उदय देशमुख, विलास शेळके, भानुदास येण्णावार, गिरीश जोशी, अंबादास उमाळे, राजेश्‍वरी शर्मा, गजानन लोणकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Special aircraft for BJP's newly elected MLAs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.